होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

On: September 6, 2026 5:02 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाने शनिवारी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग तसेच गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली. यावेळी विसर्जन घाटांची झालेली दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे आणि अपुऱ्या सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महापौर विनायक कोडगुल आणि आयुक्तांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्ती व स्वच्छतेचे आदेश देण्यात आले.

पाहणीदरम्यान सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाटावर पायऱ्यांचे दगड तुटलेले असून काही ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. तसेच विसर्जन कुंडात मागील वर्षीच्या गणेशमूर्तींचे अवशेष आढळल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. घाटांची तात्काळ स्वच्छता करून आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

महापौर विनायक कोडगुल यांनी गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेताना शहरातील सर्व प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी केली. या वेळी गणपती घाट, विष्णू घाट, धर्मवीर संभाजी तलाव आणि हिपरप्पा लाव परिसरातील सुविधांची तपासणी करण्यात आली. मिरवणूक मार्गांवर असलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून भाविक व नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी माजी उपमहापौर ज्ञानेश्वर देवकते, स्थायी समिती सभापती रंजिता चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रीतम गावकर, सहायक अभियंता सुनीता इमारे, सार्वजनिक आरोग्य अभियंता यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी वापराबाबतही चर्चा करण्यात आली. पोलिस प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ध्वनीप्रदूषण नियंत्रणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

गणेशोत्सवात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वाहतूक, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत समन्वय साधण्यासाठी मंगळवारी विभागीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी सहभागी होऊन उत्सव काळातील नियोजनाचा अंतिम आढावा घेणार आहेत.

महानगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा यासाठी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, मिरवणूक मार्ग आणि विसर्जन घाटांवरील त्रुटी तातडीने दूर करण्यावर भर दिला आहे.

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

नवरात्रोत्सवासाठी आई तुळजाभवानी मंदिर सज्ज!

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment