होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देईल : महापौर कोंड्याल

On: August 26, 2026 11:14 AM
Follow Us:
---Advertisement---

पत्रकारांनी वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडावेत

पत्रकार किरण बनसोडे लिखित ‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचे प्रकाशन

सोलापूर : पत्रकारिता ही लोकशाहीचा आरसा असून पत्रकारांनी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडले पाहिजेत. प्रशासनातील त्रुटी असोत अथवा नागरिकांच्या समस्या, त्या कोणताही मुलाहिजा न ठेवता लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणे काम केले, तर जीवनात यश नक्की मिळते. ‘मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देईल,असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.

 


पत्रकार किरण बनसोडे लिखित जागृती पब्लिकेशन प्रकाशित ‘मीडिया मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन महापौर कोंड्याल यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, दैनिक तरुण भारतचे समूह मुख्य संपादक दिलीप पेठे, मुख्य संपादक प्रशांत माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश कोरे , श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार विजय गायकवाड, प्रकाशक सोमनाथ गायकवाड, लीना बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मध्यम साक्षरता चळवळीत योगदान देणारे
प्रा. डॉ. अंबादास भास्के आणि विजय लोंढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोंड्याल पुढे म्हणाले, किरण बनसोडे यांनी पत्रकारितेतील २४ वर्षांचा अनुभव ‘मीडिया मास्टर’च्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडला आहे. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया माध्यमातून अनेकजण पत्रकारितेत येत आहेत. मात्र समाजात नेमके काय घडत आहे, याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांसमोर मांडणारे आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार घडणे आवश्यक आहे. या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे आहे. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी आदर्श निर्माण करणारे हे पुस्तक असल्याचेही महापौर कोंड्याल यांनी सांगितले.
सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आज हा ‘सोन्याचा दिवस’ पाहायला मिळाल्याचे भावूक मनोगत लेखक किरण बनसोडे यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार विजय गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी तडवळकर यांनी केले. यावेळी भालचंद्र साखरे, श्रावण भंडारे, डॉ. हिराकांत जाधव, समाधान जाधव यांच्यासह पत्रकारिता, शिक्षण, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निष्ठावंत पत्रकारितेचा वारसा : दत्ता गायकवाड

सोलापूरच्या वृत्तपत्र परंपरेला ‘सोलापूर समाचार’पासून मोठा आणि निष्ठावंत इतिहास लाभला आहे. रंगाअण्णा वैद्य आणि व्ही. आर. कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांनी या भूमीत पत्रकारिता आणि साहित्य समृद्ध केले. किरण बनसोडे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत, विचारांशी प्रामाणिक राहून आणि सामाजिक बांधिलकी जपत ही परंपरा पुढे नेली आहे. हे पुस्तक सोलापूरच्या वैचारिक वारशात भर घालणारे ठरेल, असा विश्वास विचारवंत दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला.

‘मीडिया मास्टर’ २१ विद्यापीठांसाठी
अभ्यासू ग्रंथ : डॉ. शिवाजीराव शिंदे

विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी ‘मीडिया मास्टर’ पुस्तकाच्या रचनेचे कौतुक केले. १४६ पानांच्या या ग्रंथात ४६ महत्त्वाच्या मुद्द्यांचा आणि १०० टिप्सचा सूक्ष्म अभ्यास सोप्या भाषेत मांडला आहे. हे पुस्तक केवळ पत्रकारांसाठीच नव्हे, तर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठीही मार्गदर्शक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २१ विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार व प्रशासन एकमेकांना पूरक : मल्हारी माने

पत्रकार आणि प्रशासन हे एकमेकांचे विरोधी नसून समाजहितासाठी काम करणारे पूरक घटक आहेत, असे मत मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माळी यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी व्यवस्थेतील चांगल्या गोष्टींचे उदात्तीकरण करण्यासोबतच त्रुटींवर बोट ठेवून प्रशासनाला वेळीच सुधारण्याची संधी दिली पाहिजे. किरण बनसोडे यांच्या ‘मीडिया मास्टर’ ग्रंथाला त्यांनी प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

सामाजिक बांधिलकीचे कौतुक : भालशंकर

नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बनसोडे यांनी सातत्याने लेखणी चालवली आहे. हे पुस्तक नव्या पिढीला बातमीदारीचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे धडे देणारे एक उत्तम माध्यम ठरेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

बातमीतील विश्वासार्हता
टिकवण्याचे आव्हान : प्रशांत माने

आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेसमोरील विश्वासार्हतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीची योग्य खातरजमा केल्याशिवाय पत्रकारांनी बातमी पुढे नेऊ नये, असे मत तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने यांनी व्यक्त केले. किरण बनसोडे लिखित ‘मीडिया मास्टर’ हे पुस्तक सर्वांनी वाचल्यास समाजातील प्रत्येक घटक प्रत्यक्ष पत्रकार झाला नाही, तरी पत्रकाराच्या भूमिकेत प्रभावी काम करू शकतो. बनसोडे यांच्या बातम्यांवर संपादक म्हणून संस्कार करावे लागत नाहीत, हेच त्यांच्या पत्रकारितेचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

——–

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment