होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात ३४ प्रश्न मांडले खा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले रिपोर्ट कार्ड सादर सोलापूरची लेक म्हणून संसदेत सोलापूरच्या विषयांवर भाष्य नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य प्रश्नांकडे लक्ष वेधले पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ताई ने मुझे सोलापूर की बहुत ही अच्छी चादर भेट दी है और वो मुझे बहुत पसंद आई’..

On: August 24, 2026 2:40 PM
Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर : राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात १०० टक्के उपस्थिती नोंदवत सहा विधेयकांवर भाष्य आणि ३४ प्रश्न मांडून सोलापूरची लेक म्हणून आपली कामगिरी सिद्ध केली.नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले, अशी माहिती शिवसेनेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर नगरसेवक अमोल शिंदे, प्रियदर्शन साठे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पीएची मदत न घेता स्वतः प्रश्न तयार करून संसदेत मांडले. पहिल्याच अधिवेशनात सहा विधेयकांवर बोलण्याची संधी मिळाली. यामध्ये वंदे मातरम्, जन्म-मृत्यू नोंदणी दुरुस्ती, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, बँकर्स बुक्स एव्हिडन्स, केरळ अल्टरशन ऑफ नेम आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या विधेयकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगासह सोलापुरी चादर, विमानतळाचे नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि घरकुल आदी प्रश्न संसदेत मांडल्याचे त्यांनी नमूद केले. २२ दिवसांच्या अधिवेशनात सुमारे १५० प्रश्न विचारले मात्र बॅलेट प्रक्रियेतून ३४ प्रश्न निवडले गेले. यामध्ये सहा तारांकित प्रश्नांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सोलापुरी चादर भेट दिल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. सोलापुरी चादरीचे पंतप्रधानांनी केलेले कौतुक हा सोलापूरची लेक म्हणून अभिमानाचा क्षण असल्याचे त्या म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठबळा बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्यानंतर वन स्टॉप सेंटर आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा घेतला. महिलांना तातडीने वैद्यकीय व पोलिस मदत मिळावी तसेच मातृवंदना योजनेतील आर्थिक मदत वाढवावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले.

सोलापूरची लेक म्हणून तो
माझ्यासाठी गौरवाचा क्षण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन वेळा भेटता आलं. पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्ट साठी भेटले. त्याच दिवशी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्यांच्यासमवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आवर्जून मोदी यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की ‘ताई ने मुझे सोलापूर की बहुत ही अच्छी चादर भेट दी है और वो मुझे बहुत पसंद आई’. म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं, हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता.

एनडीएच्या काळात इन्साफ मिळेल

रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स अमेंडमेंट बिल’ यामध्ये डिजिटलायझेशन होत असताना शोषित, वंचित, मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त यांच्या हक्काला बाधा पोहोचू नये हे तिथे आग्रहाने बोलले.​’द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल’ हे तिसरं बिल होतं ज्याच्यावरती माझं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढल्यामुळे आता मोदी यांच्या एनडीएच्या शासन काळात तारीख पे तारीख मिळणार नाही तर इन्साफ मिळेल ही अपेक्षा मी त्या भाषणामध्ये व्यक्त केली असल्याचे खासदार वाघमारे यांनी सांगितले.

वार्तालापातील ठळक मुद्दे –

– राज्यसभेत १०० टक्के उपस्थिती दर्शवली
– पहिल्याच अधिवेशनात ३४ प्रश्न आणि सहा विधेयकांवर भाष्य.
– सोलापुरी चादर, टेक्स्टाईल उद्योग, विमानतळाचे नाईट लँडिंग आणि रेल्वे सुविधांचे प्रश्न संसदेत मांडले.
– शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि गरीबांच्या घरकुलासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरी चादर भेट, चादरीचे कौतुक हा अभिमानाचा क्षण
-‘सोलापूरची लेक’ म्हणून संसदेत मांडलेल्या कामाचा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सादर केले रिपोर्ट कार्ड.
—-

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment