होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

शिवछत्रपतींची न्यूयॉर्कमध्ये भव्य मिरवणूक – छत्रपती फाउंडेशन तर्फे आयोजन

On: August 20, 2026 2:50 PM
Follow Us:
---Advertisement---

* भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने यावर्षी १६ आगस्ट ला इंडीया डे परेड चे आयोजन न्युयॉर्क मध्ये…
* यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कीर्तिरथ छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आला
* सह-आयोजक: किर्तीरथासोबत जल्लोश ढोल ताशा पथकाच्या ५० हुन अधिक वादकांनी न्यूयॉर्क शहर दुमदुमून टाकले
* सह-आयोजक: जगप्रसिद्ध रुद्रा डान्स ग्रुप च्या मुलींनी अनेक लोकनृत्ये सादर केली. लिविंगस्टनचा राजा ग्रुपच्या नववारी लुगड्यात नसलेल्या युवतींनी लेझीम नृत्य सादर करत रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या समुदायाचे मन जिंकले
* सह-आयोजक: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग MTDC तसेच मराठी भाषा मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे मदत होती

* परेड ग्रँड मार्शल चा मान न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी होचल यांना देण्यात आला. होचल यांनी न्यूयॉर्कच्या विकासात भारतीय समुदायाचे योगदान अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले
* बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडे तसेच हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चश्मा ची संपूर्ण टीम उपस्थित होती
* मिशीगन राज्याचे US हाऊस ऑफ रेप्रेसेंटेटीव्ह (खासदार) श्री श्री ठाणेदार ह्यांची पूर्णवेळ कीर्तीरथावर विशेष अतिथी म्हणून उपस्थिती. त्यांनी रथावरून रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला अभिवादन केले तसेच परेड स्टेजवरून परेडचे निरीक्षण केले. मागच्या वर्षी सुद्धा मी उपस्थित होतो, परेडमधील आपल्या सांस्कृतिक आणि इतिहासाचं प्रदर्शन तसेच तरुण पिढीचा उत्साही सहभाग बघून मी गहिवरून गेलो. त्यामुळे ह्यावर्षी आवर्जून ह्यावेळी मी परेडची वाट बघत होतो.

* श्री ठाणेदार ह्यांनी शिवाजी महाराज हे सर्वोत्तम स्ट्रॅटेजिस्ट होते. त्यांचे गुण, त्यांची न्याय्य वृत्ती, त्यांच्यातील उद्योजकता आजही अत्यंत प्रेरणादायी आहे. शिवरायांच्या चरित्रातून अनेक धडे आजच्या युवकांनी घ्यावे असे आव्हाहन करीत त्यादिशेने छत्रपती फाऊंडेशन काम करीत असल्याबद्दल अभिनंदन केले.

* न्यू हॅम्पशायर राज्याचे स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह (आमदार ) श्री संतोष साळवी हयांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती.
* भारताचे न्यूयॉर्क येथील उप-राजदूत श्री विशाल हर्ष व वाणिज्य दूत श्रीमती राजलक्ष्मी कदम ह्यांनी छत्रपती फाऊंडेशन सोबत अनेक वर्षांपासून असलेले सहकार्य भविष्यात अधिक वृद्धिंगत होण्याबाबत प्रयत्न करण्याची आशा व्यक्त केली


* यावर्षी विशेष म्हणजे भारतीयानासोबत मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचा तसेच विविध देशांमधून आलेल्या लोकांचा लक्षणीय सहभाग होता. अनेक प्रतिक्रियांमधून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिवसाबाद्ल शुभेच्छा दिल्या. परेड मध्ये सादर केलेले ढोल-ताशा, संगीत, पारंपारिक पोषाख, नृत्ये व ऐतिहासिक दृश्याचे कौतुक केले. अत्यंत आनंददायी वातावरणात सगळ्यांनी परेडचा आनंद लुटला

* रथावर शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा व मावळ्यांची भूमिका सादर.. बालक, महिला व युवकांनी दिमाखदार अभिनय व आकर्षक पोशाखाद्वारे ऐतिहासिक क्षण जिवंत केले.


* १०० हुन अधिक लोकांनी महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृतीचे भव्य प्रदर्शन सातासमुद्रापार केले. महाराष्ट्रातील लोककलेचा आगळावेगळा अनुभव अमेरिकेतल्या लोकांना दिला
* अमेरिकेत वास्तव्यास असलेले सर्व प्रांतातील भारतीय लोक या परेड मधे मोठ्या उत्साहात सहभागी झाले

* विशेष: उद्योग व करिअर चर्चासत्र:
* छत्रपती फाऊंडेशन संलग्न हॉस्पिटॅलिटी व IT क्षेत्रातील २० कंपनीचे संस्थापक, सीईओ, सीटीओ ह्यांसोबत काँग्रेसमन श्री ठाणेदार व रिप्रेझेंटेटिव्ह संतोष साळवी ह्यांची चर्चासत्रात सहभाग घेतला
* ह्यावेळी दोघांनी स्वतः महाराष्ट्रातुन सुरुवात करत आपण कसे स्वतः अमेरिकेत येऊन उद्योग सुरु केला ह्याचा अनुभव सांगितला. छत्रपती फाऊंडेशनच्या सदस्यांनी सुरु केलेल्या कंपनीमध्ये आज शेकडो रोजगार ऊपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले. त्याचबरोबर समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणावर उद्योगात मदत करण्यासाठी स्वतः वेळ आणि पैसा उभा करण्याचे वचन श्री ठाणेदार व श्री साळवी ह्यांनी दिले
* सध्यस्थितीत नोकरीत असलेल्या लाखो मराठी युवकांना व्हिसा धोरणाचा तसेच AI मुळे आलेल्या बदलांचा एकत्र सामना करावा लागत आहे. विशेषतः: शैक्षणिक कर्ज काढून आलेल्या अनेक विध्यार्थ्यांना भविष्यातील नोकरीबद्दल चिंता हा प्रमुख मुद्दा सदस्यांनी मांडला. त्यावर IT सीईओ नी मार्गदर्शन तसेच मदत करण्याचे आवाहन केले

* प्रचंड उत्साहात हजारो भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांच्या जल्लोशात जगाची आर्थीक राजधानी न्यूयॉर्क मधील प्रशस्त मॅडिसन अव्हेन्यू हा भगवामय झाला होता
* मुख्यतः विध्यार्थी व तरुणांच्या नेतृत्वात छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून न्यूयॉर्क मध्ये शिवजयंती, जिजाऊजयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंती च्या माध्यामातून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्कस्थित भारतीय दूतावासात शिवजयंतीचे आयोजन केले होते. फौंडेशनच्या वीवीध उपक्रमात या उपक्रमामुळे अजुन एक माणाचा तुरा खोवला गेला आहे .
* फेडेरेशन ऑफ इंडियन असोशिएशन्स ह्या संस्थेतर्फे दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन केल्या जाते
* कीर्तीरथाच्या भरदस्त आयोजनासाठी छत्रपती फाऊंडेशन च्या १० राज्यातून आलेल्या सदस्यांनी अपार मेहनत घेतली.

छत्रपती फाउंडेशन, न्यूयॉर्क, अमेरिका

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment