
अध्यक्षपदी सुरज कमाने; सामाजिक, धार्मिक व युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार…
दौंड (जि. पुणे) : तुकाई नगरचा राजा मित्र मंडळाची सन २०२६-२०२७ या वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी सुरज कमाने यांची निवड झाली असून, नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक तसेच युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष अक्षय साठे, खजिनदार बाबू भोळे, उपखजिनदार प्रथमेश दौलताबाद, कार्याध्यक्ष सोनू बनसोडे, उपकार्याध्यक्ष हर्ष चलवाडी, सचिव संकेत अलदार, उपसचिव अथर्व कांबळे तसेच सोशल मीडिया अध्यक्ष निखिल नायककर यांची निवड करण्यात आली.
तुकाई नगरचा राजा मित्र मंडळाची स्थापना २००४ मध्ये झाली असून, सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याची परंपरा मंडळाने कायम ठेवली आहे. यापुढेही विविध सामाजिक उपक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक व्याख्याने तसेच आरोग्यविषयक सर्वसामान्यांसाठी उपक्रम आयोजित करण्याचा मानस नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला.
“समाजासाठी धडपड, युवकांसाठी समर्पण आणि प्रत्येकासाठी सदैव तत्पर” या भूमिकेतून मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भक्ती, सेवा, संस्कार आणि समाजहित हीच तुकाई नगरचा राजा मित्र मंडळाची ओळख असून, गणरायाच्या आशीर्वादाने समाजसेवेचा संकल्प पुढे नेण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.