
लोक सम्राट विशेष वृत्तान्त – जुळे सोलापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची बैठक मंडळाचे आधारस्तंभ, संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक मधुकर जंगम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या विविध धार्मिक, सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे नियोजन यावेळी करण्यात आले.
या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवासाठी अध्यक्षपदी ओम अमृतलिंग बळुरगी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी वरूण विजापूरे यांची निवड करण्यात आली. तसेच मंडळाच्या विविध जबाबदाऱ्यांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या कार्यकारिणीत सिद्धाराम बिराजदार, विरेश चडचणकर, नितीन बडदाळे, अभिषेक जंगम, सचिव निचल जंगम, माजी अध्यक्ष अमृत बळुरंगी, लेझीम प्रमुख संजय कलादगी, खजिनदार तसेच मिरवणूक प्रमुख निलेश डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
आगामी गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, जनजागृती, सांस्कृतिक उपक्रम तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
परिसरातील नागरिकांचा उत्सवामध्ये अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, गणेशोत्सव शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मंडळाचे आधारस्तंभ तथा संस्थापक अध्यक्ष नगरसेवक मधुकर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित अध्यक्ष ओम अमृतलिंग बळुरगी, उपाध्यक्ष वरूण विजापूरे आणि सर्व पदाधिकारी आगामी गणेशोत्सवाचे नियोजन करणार आहेत. नूतन कार्यकारिणीचे उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी अभिनंदन करून आगामी उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

— नेटवर्क