होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

मी कोणाच्या वाट्याला जात नाही, छेडाल तर उत्तर देईन..

On: August 14, 2026 4:20 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मी कोणाच्या वाट्याला जात नाही, छेडाल तर उत्तर देईन

श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची रोखठोक भूमिका…

विमानतळ, टेक्सटाईल पार्क, घरकुल, बीओटीसह विविध विषयांवर भाष्य….

त्या १८ गुन्ह्यांपैकी १५ प्रकरणांत निर्दोषत्व सिद्ध…

सोलापूर : सोलापूरच्या विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, विमानसेवा, टेक्सटाईल पार्क, आयटी पार्क, एमआयडीसी विस्तार, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जात आहे. विकासाच्या प्रश्नांवर राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याची भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक मनीष केत, संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे उपस्थित होते. प्रास्ताविक विक्रम खेलबुडे यांनी केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री म्हणून १८ महिने पूर्ण झाले असून, समांतर जलवाहिनी, विमानसेवा, उड्डाणपूल, टेक्सटाईल पार्क यांसारखे अनेक प्रश्न पुढे आले. टेक्सटाईल पार्कचा प्रश्न मार्गी लागल्याने सुमारे १० हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. सोलापूरची गुंतवणूक वाढविण्यासाठी एमआयडीसीचा विस्तार, आयटी पार्क आणि वस्त्रोद्योगाला नव्या सवलती देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोरामणी विमानतळाच्या प्रश्नावर बोलताना विद्यमान विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ८०० ते १ हजार कोटी, तर बोरामणीसाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. माळढोक पक्ष्याच्या अस्तित्वाबाबत वन विभागाचा अहवालही महत्त्वाचा ठरणार असून, विमानतळाबाबत सरकार तातडीने निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे ते म्हणाले.
आदिला नदीच्या ब्लू व रेड लाईनच्या प्रश्नावर नागरिकांना दिलासा देताना, एकाही घरावर हातोडा पडू देणार नाही मात्र नव्याने बांधकाम करताना काळजी घ्यावी. नदी-नाल्याचा प्रश्न सोडवून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या सात जागा बीओटीवर विकसित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करताना, निष्क्रिय जागांचा विकास करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे.काम होण्याआधी ते कायदेशीर की बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार कोणाला? असा सवालही त्यांनी केला.
प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रात एका वर्षात साडेपाच लाख घरे पूर्ण झाली असून, आता १५ लाख घरांचे उद्दिष्ट असल्याचे गोरे यांनी सांगितले. सोलापूरसह राज्यातील महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात १३ मॉलचे काम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे
सदस्य प्रमोद बोडके यांनी केले. आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले.

वार्तालापातील ठळक मुद्दे असे—

– बोरामणी विमानतळासाठी सुमारे ६०० कोटींचा पर्याय, निर्णयासाठी सरकार सकारात्मक.
– आदिला नदीच्या प्रश्नावर एकाही घरावर हातोडा पडू देणार नाही.
– सात महापालिका जागा बीओटीवर विकसित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन.
– प्रधानमंत्री आवास योजनेत १५ लाख घरांचे उद्दिष्ट.
– महिलांसाठी राज्यात टप्प्याटप्प्याने उमेद मॉल उभारणार.
– सोलापूरच्या विकासासाठी एमआयडीसी, आयटी पार्क व वस्त्रोद्योग विस्तारावर भर.

 

दोषींवर कारवाई, निर्दोषांना संरक्षण

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३८ संस्थांच्या चौकशीबाबत गोरे म्हणाले, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करून पैसे वसूल केले जातील; मात्र निर्दोषांवर कारवाई होणार नाही. दोषी व्यक्तींच्या सोबत आम्ही निवडणूक लढणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

विनाकारण छेडू नका, उत्तर
द्यायलाही कमी पडणार नाही

स्वतःवरील आरोपांवर गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आपल्यावर दाखल १८ गुन्ह्यांपैकी १५ प्रकरणांत निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे सांगत, उर्वरित तीन प्रकरणांचा न्यायालयीन निकाल स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी कोणाच्या वाट्याला जात नाही; मात्र विनाकारण छेडले तर उत्तर द्यायलाही कमी पडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का, ते तपासा

मला कुठल्याही ब्रीफिंगची गरज भासत नाही.मी जनतेत राहतो आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करतो. मात्र माझ्यावर आरोप करण्यापूर्वी संबंधितांना मिळालेले ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का, याची खात्री करून घ्यावी. चुकीच्या माहितीच्या आधारे विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका. मी कोणाच्या वाट्याला जात नाही; मात्र विनाकारण छेडले तर उत्तर द्यायलाही कमी पडणार नाही, असा रोखठोक इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

 

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment