होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर महापालिके समोरील फरशीची दुरवस्था…

On: August 14, 2026 11:57 AM
Follow Us:
---Advertisement---

 


.सोलापूर विशेषवृत्तांत निलेश डांगे:- सोलापूर महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांकडून नाराजी
सोलापूर महानगरपालिकेच्या समोर शारदा देवीच्या पूर्णाकृती मूर्तीच्या परिसरात जैन कारंजे बसविण्यात आले आहे. मात्र, कारंजे परिसरातील फरशीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फरशीचे मोठे स्लॅब जागेवरून हलले असून काही ठिकाणी फरशी उखडलेली आहे. काही भागात चक्क मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला अवघे काही तास शिल्लक असताना महापालिकेच्या अगदी समोरील परिसराची ही अवस्था नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका परिसरात नागरिकांची, अधिकारी-कर्मचाऱ्यांची तसेच विविध मान्यवरांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी परिसरातील फरशीची दुरुस्ती न झाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

लोक सम्राट न्यूज विशेष वृत्तान्त लक्ष….

फरशीखालील भाग उघडा पडल्याने पादचाऱ्यांचा पाय अडकण्याची शक्यता आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो. काही फरशीचे तुकडे बाजूला पडले असून, परिसरातील दगडही अस्ताव्यस्त दिसत आहेत.
महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे केली जात असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोरीलच परिसराची अशी अवस्था का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्वच्छता, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेबाबत प्रशासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून उखडलेल्या व धोकादायक फरशीची दुरुस्ती करावी. तसेच कारंजे व परिसराची स्वच्छता करून नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment