
शिवदारे प्रतिष्ठानतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाही
वैद्यकीय, सामाजिक, कृषी व पत्रकारिता क्षेत्रातील .चार मान्यवरांचा होणार सन्मान; १७ ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा…
सोलापूर : श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान, सोलापूरच्या वतीने सामाजिक, वैद्यकीय, कृषी आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व दीर्घकाळ कार्य करणाऱ्या चार मान्यवरांना यंदाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक पुरस्कारार्थीस २१ हजार १ रुपयांची रोख रक्कम व. ह स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. विरेंद्रकुमार सत्यांकार अवस्थी, सामाजिक क्षेत्रातून मटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, यमगरवाडी, कृषी क्षेत्रातून श्री. दिनकर बळीराम गुंड आणि पत्रकारिता क्षेत्रातून श्री. राहुल कुलकर्णी यांची निवड करण्यात 
चार क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरववैद्यकीय क्षेत्र – डॉ. विरेंद्रकुमार सत्यांकार अवस्थी :डॉ. अवस्थी यांनी सोलापूरमध्ये नेत्रचिकित्सा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सोलापूर येथील अद्ययावत सोयींनीयुक्त नेत्रालयाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवा केली. अक्कलकोट परिसरातील गरजू व गरीब रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
ओ
सामाजिक क्षेत्र – भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, यमगरवाडी :तुळजापूर तालुक्यातील नांदुरी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान शिक्षण, स्वावलंबन, सुरक्षा आणि समानतेच्या माध्यमातून विमुक्त भटक्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. आश्रमशाळा, वसतिगृह, क्रीडा-सांस्कृतिक उपक्रम तसेच मुलींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेच्या माध्यमातून विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.

कृषी क्षेत्र – श्री. दिनकर बळीराम गुंड :
बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकरी श्री. दिनकर गुंड यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. सुमारे ११५ एकर क्षेत्रावर शेती करताना त्यांनी वांगी, ऊस, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या प्रयोगशील शेतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी अधिकारी तसेच शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असल्याचे प्रतिष्ठानने नमूद केले आहे.
पत्रकारिता क्षेत्र – श्री. राहुल कुलकर्णी :
धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार व संपादक म्हणून राहुल कुलकर्णी यांची ओळख आहे. डिजिटल माध्यमातही ते सक्रिय असून राजकीय, सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरील वार्तांकन, विशेष मुलाखती आणि सखोल विश्लेषणासाठी ते परिचित आहेत. पत्रकारितेतील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
१७ ऑगस्टला पुरस्कार वितरण
श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर वि. शिवदारे यांच्या पुढाकाराने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता सोलापूर येथील ‘किलॉस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय संकुल, पार्क चौक’ येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
कार्यक्रमास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आ. बसवराज पाटील (मुरूमकर) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ‘सोलापूर जिल्ह्याचे जल-नियोजन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
शिवदारे प्रतिष्ठानची समाजाभिमुख परंपरा
कै. वि. गु. शिवदारे अण्णांनी सार्वजनिक, सामाजिक व राजकीय जीवनात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. १९९९ पासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, सामुदायिक विवाह, शैक्षणिक उपक्रमांसाठी आर्थिक मदत तसेच विविध संस्थांना सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती पत्रिकेत देण्यात आली आहे.
याच सामाजिक बांधिलकीतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर वि. शिवदारे व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
