
सोलापूर | प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त मातंग समाज कृती समिती, शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमस्थळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेसह समितीच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र असलेला भव्य फलक लावण्यात आला होता. मिरवणुकीत विविध मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर केला.
यावेळी समितीचे शहर अध्यक्ष अॅड. शैलेश पाटकोटे, जिल्हाध्यक्ष युवराज पवार, कार्याध्यक्ष राजाभाऊ क्षीरसागर, उपाध्यक्ष श्रीकांत देडे, सचिव रमेश बोराडे, सहसचिव प्रभाकर कांबळे यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचा सत्कार करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक समता, बंधुभाव आणि परिवर्तनाचा संदेश देत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
📸 
लोक सम्राट न्यूज नेटवर्क निलेश डांगे
मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करताना समितीचे पदाधिकारी व मान्यवर. कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्ते आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सजविण्यात आलेला परिसर.

सोलापूर सिटी 24तास न्यूज चे संपादक गणेश भालेराव