होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

नवी पेठ-चौपाड परिसरात लोकमंगल परिवाराची व्यावसायिक संवाद बैठक उत्साहात संपन्न…

On: August 7, 2026 4:10 PM
Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, प्रतिनिधी :

जोडूया नाती, वाढवूया व्यवसाय, घडवूया समृद्ध समाज!” या घोषवाक्याने *प्रभाग क्रमांक ७* मधील नवी पेठ व चौपाड परिसरातील विठ्ठल मंदिर येथे लोकमंगल परिवारातर्फे व्यावसायिक संवाद बैठक उत्साहात पार पडली. लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार मा. सुभाष बापू देशमुख यांच्या प्रेरणेतून आयोजित या बैठकीस लघु, मध्यम व मोठे उद्योजक, महिला उद्योजिका, व्यापारी व विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून बिनाकेम फार्मसीचे प्रमुख श्री. जीतेशभाई पटेल, नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे सचिव श्री. विजय पुकाळे, लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक श्री. निलेशभाई पटेल आणि लोकमंगल पतसंस्थेच्या सल्लागार डॉ. सौ. अस्मिता भालवलकर* उपस्थित होत्या.

*प्रास्ताविकात श्री. प्रवीण खरात व सौ. सरोजिनी निकम* यांनी लोकमंगल परिवाराच्या सामाजिक व आर्थिक कार्याचा आढावा घेतला. *विश्वमंगल मराठी फाउंडेशनचे समन्वयक श्री. विजय पाटील* यांनी उद्योग विभागाच्या योजनांची माहिती दिली. तसेच बँकेच्या संचालक *श्री. निलेशभाई पटेल* यांनी उद्योजकांना आधुनिक आर्थिक नियोजनासह २५ दिवसांत सुलभ कर्जपुरवठ्याची ग्वाही दिली, तर *श्री. विजय पुकाळे* यांनी व्यापाऱ्यांनी लोकमंगल परिवाराच्या बँकिंग सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. *श्रीमती रूपाली तळभंडारे* यांनी विविध कर्ज योजना, व्याज परतावा व वित्तीय सुविधांची माहिती दिली. *डॉ. सौ. अस्मिता भालवलकर* यांनी महिला सन्मान योजना व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी श्री. सतीश आमसिद्ध जंगलगी यांना ओबीसी महामंडळ योजनेंतर्गत मंजूर रु. १५ लाखांच्या कर्जाचा प्रतीकात्मक धनादेश प्रदान करण्यात आला.

बैठकीत उद्योजकांच्या अडचणी व अपेक्षांवर मुक्त चर्चा झाली. लोकमंगल परिवाराच्या तिन्ही वित्तीय संस्थांमार्फत उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्राला सातत्याने आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमासाठी लोकमंगल बँकेचे *मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेशसिंह बायस* यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन श्री. प्रवीण खरात यांनी, तर आभार प्रदर्शन सौ. सरोजिनी निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशासाठी श्री. सौरभ घाडगे, श्री. धर्मराज मळगे, श्री. गौरेश कुंभार, श्री. चारुदत्त बिराजदार, श्री. अमोल मिस्किन, श्री. राहुल पवार, श्री. शंतनू सुरवसे, सौ. शुभांगी चव्हाण, श्रीमती अपर्णा पाटील, श्री. हनुमान जगताप, सौ. वर्षा शिंदे, श्रीमती शोभा बिराजदार, श्री. हरी तोर, श्री. नलावडे तसेच लोकमंगल परिवारातील सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment