होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण 08 जण अटकेत. सोलापूर शहर, गुन्हे शाखेची कारवाई…

On: August 5, 2026 5:29 PM
Follow Us:
---Advertisement---

.

सोलापूर.

 

डॉ. ऋत्विक देविदास जयकर, वैद्यकीय अधिष्ठाता, छ.शि.म.स.रूग्णालय सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलीस ठाणे येथे गु.र.नं- 554/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 336(3), 338, 340(2),233, 235, 3(5) हा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची थोडक्यात अशी की, इसम नामे राजेश भाऊसाहेब जाधव, रा. आहिल्यानगर याने कनिष्ठ लिपीक, पाटबंधारे विभाग अहिल्यानगर हि शासकीय नोकरी नियमित करणेकरीता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधारकार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळणेकामी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दि. 11/05/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सदरचा तपास मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम. राज कुमार सो यांनी गुन्हे शाखा सोलापूर शहर यांचेकडे सोपविला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे दिलीप पवार, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथक यांनी चालू केला.

सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने तपासी अधिकारी यांनी संपुर्ण तांत्रिक माहिती प्राप्त करून दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित झालेले आरोपी राजेश भाऊसाहेब जाधव याचा शोध घेवून त्यास गाव- करंदी ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथून ताब्यात घेवून या गुन्ह्यामध्ये अटक केली. अटकेदरम्यान त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढुन देण्याच्या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली आहे. आत्तापर्यंत एकूण 08 आरोपीतांना अटक केली असुन त्यांची माहिती खालील प्रमाणे .

 

(1) राजेश भाऊसाहेब जाधव, वय- 38 वर्षे, पत्ता- घ.नं-19, हुडको, नळेगाव व्हीटीसी नगर, अहमदनगर

व्यवसाय- नोकरी कनिष्ठ लिपीक, पाटबंधारे विभाग अहिल्यानगर.

(2) महेश दिनकर बारगजे, वय 52 वर्षे, धंदा.व्यवसाय, रा. घर नं.31 बी. अनंततीर्थ कॉलनी, बुरुडगाव

रोड, अहिल्यानगर.

(3) राजेश रमाकांत ढवण, वय-58 वर्षे, व्यवसाय :-सिव्हील हॉस्पीटल अहिल्यानगर येथुन लॅब असिस्टंट

या पदावरुन सेवानिवृत्त. रा. घर नं. 555 अ. सप्तश्रीगी निवास, ठाकुन गल्ली, तोफखाना,

अहिल्यानगर.

(4) विजय बाबासाहेब गर्जे, वय-48 वर्षे, व्यवसाय- प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद अहिल्यानगर

रा.प्लॉट नं.13 महात्मा फुले नगर पाथर्डी, जि.अहिल्यानगर

(5) अरुण रामदास शिंपी, वय-70 वर्षे, व्यवसाय- खाजगी नोकरी, सेवानिवृत्त. (बाटा कंपनीत सेल्समन)

रा.शिवधारा अपार्टमेंट फ्लॅट नं.4, उत्तम नगर, अंबड लिंग रोड, नियर बुरकुर्ले होल, सिडको, नाशिक.

 

(6) वसीम शौकत खान, वय-42 वर्षे, व्यवसाय- वरिष्ठ लिपीक नोकरी, नेम. सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर.

रा. 222 गजानन नगर, आयडीयल उर्दु स्कूल जवळ, होटगी रोड मजरेवाडी, सोलापूर

(7) सागर गोविंद रजपूत, वय 42 वर्षे, व्यवसाय- वरिष्ठ लिपीक नोकरी,नेम. सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर.

रा.17/33 वसंतराव नाईक नगर, नेहरु नगर, विजापूर रोड, सोलापूर,

(8) सतीश भाऊराव कनाके, वय-31 वर्षे, व्यवसाय निवासी वैद्यकीय अधिकारी, नेम. सध्या जिल्हा महिला व

बाल रुग्णालय सोलापूर. रा. मु. गणेशपुर, पो.कोठारी, ता.किनवट, जि.नांदेड,

 

गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी क्र. 1 याचे बनावट आधारकार्ड कोठे तयार केले याबाबत तपास करून सदर संगणक व इतर साहित्य तपासकामी जप्त करण्यात आले आहे. तसेच बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनविण्यासाठी वापरलेले सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथील संगणक ही तपासकामी जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचे तपासकामी सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर याचेकडून दि.01/01/2025 ते 31/06/2026 पर्यंत एकूण 3714 प्रमाणपत्र दिल्याचे व त्यापैकी 08 प्रमाणपत्रे हे तज्ञाची तपासणी न होता वितरीत झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने पुढील तपास चालू आहे.

 

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त, (गुन्हे/वि.शा.), दिलीप पवार, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे

सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, भरत चंदनशिव व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद रजपुत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, सफौ. अंकुश भोसले, जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्‌ठल यलमार, धिरज सातपुते, अमोल यादव, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, चालक बाळासाहेब काळे, सतिश काटे तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment