
सोलापूर, दि. २ ऑगस्ट : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी विविध भागांत विशेष धडक मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान संशयितांची कसून चौकशी करण्यात आली असून, अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही कार्यरत करण्यात आली आहेत.
पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, संवेदनशील भाग, रेल्वे स्थानक परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ चौकशी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गस्त वाढविण्यात आली.
यावेळी नागरिकांना कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले की, शहरातील शांतता व सुरक्षिततेसाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही नियमितपणे सुरू राहतील.
लोकसम्राट न्यूज नेटवर्क
- सत्य • निर्भीड • विश्वासार्ह