होम सोलापूर महाराष्ट्र राजकीय देश - विदेश क्राईम मनोरंजन
---Advertisement---

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्याच्या जयती निमीत्त अभिवादन;

On: August 1, 2026 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

१ ऑगस्ट – जयंती विशेष मराठी साहित्यविश्वात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाष भाऊ साठे यांचे नाव अजरामर आहे. गरिबी, उपेक्षा आणि सामाजिक विषमता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीतून सामान्य माणसाच्या वेदना, स्वाभिमान आणि संघर्षाला शब्द दिले. त्यांनी कथा, कादंबरी, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजजागृती केली. "फकिरा" ही त्यांची गाजलेली कादंबरी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या माणसाच्या जिद्दीचे प्रतीक आहे. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा नेहमीच कष्टकरी, शेतमजूर, कामगार आणि वंचित समाज राहिला. अण्णा भाऊ साठे यांचा ठाम विश्वास होता की, साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. त्यांच्या प्रत्येक लेखनातून समानता, बंधुता, न्याय आणि मानवतेचा संदेश उमटतो. त्यांनी आपल्या कलेद्वारे सामाजिक विषमतेला प्रश्न विचारले आणि नव्या विचारांची दिशा दाखवली. आजच्या पिढीने अण्णा भाऊ साठे यांचे विचार आणि साहित्य समजून घेणे ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश त्यांच्या कार्यातून आजही तितकाच प्रेरणादायी आहे. १ ऑगस्ट, त्यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भगवा प्रांत न्यूज नेटवर्कतर्फे विनम्र अभिवादन. त्यांचे विचार आणि साहित्य समाजाला सतत प्रेरणा देत राहो, हीच खरी आदरांजली.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्याच्या जयती निमीत्त अभिवादन;सोलापूर, प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी याची शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर तसेच महार रेजीमेटचे सेवानिवृत्त अधीकारी व कर्मचारी याची यशसिद्धी संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भैय्या चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे नेतृत्व शिवपुत्र घटकांबळे यांनी केले. यावेळी डॉ. अंगद मुके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून देत सामाजिक समता, न्याय आणि परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. तसेच त्यांची जयंती साजरी करण्यामागील सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.या प्रसंगी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे डॉ. अंगद मुके, शांताराम वाघमारे, गौतम चंदनशिवे, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे, श्रीमंत गायकवाड, गोपीनाथ कांबळे, किसन सुरवसे तसेच यशसिद्धी वेल्फेअर संघटनेचे शिवपुत्र घटकांबळे, विष्णू वाघमारे, पांडुरंग बनसोडे, बाबुराव बेलभंडारे, राहुल साबळे, मोतीराम सुरवसे, सूर्यकांत गजघाटे, लिंबाजी कांबळे, मसन्ना मनोरे व आयवळे आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे खजिनदार शांताराम वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सागता करण्यात आली

Dange

लोकसम्राट न्यूज पोर्टल : जनतेच्या आवाजातून उभे राहिलेले लोकशाहीचे व्यासपीठ ‘लोकसम्राट’ न्यूज पोर्टल हे केवळ बातम्या देणारे माध्यम नसून सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा आणि समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्तेच्या केंद्रापासून सामान्य नागरिकाच्या दारापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आवाज समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारिता करते. याच विचारातून ‘लोकसम्राट’ या न्यूज पोर्टलची वाटचाल आकार घेत आहे. संघर्ष, विचार आणि सत्याची वाटचाल ‘लोकसम्राट’ची ओळख केवळ नावापुरती मर्यादित नाही. या नावामागे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य, सत्याचा शोध, अन्यायाविरोधात आवाज आणि लोकहिताची भूमिका हा विचार आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासनातील त्रुटी असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न असोत—प्रत्येक विषयाकडे लोकांच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न ‘लोकसम्राट’ करतो. ‘लोकसम्राट’ नावामागची भूमिका ‘लोकसम्राट’ म्हणजे सत्तेचा सम्राट नव्हे; लोकांच्या विश्वासाचा प्रतिनिधी अशी या नावामागची भूमिका आहे. ज्यांचा आवाज अनेकदा मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहोचत नाही, त्या सामान्य नागरिकांना व्यासपीठ मिळावे, ही या माध्यमाची भूमिका आहे. त्यामुळे ‘लोकसम्राट’च्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आहे. बातमीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची आजच्या वेगवान डिजिटल युगात बातमी सर्वप्रथम देण्याची स्पर्धा मोठी आहे. मात्र ‘लोकसम्राट’साठी केवळ वेग महत्त्वाचा नसून बातमीची विश्वासार्हता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक परिणाम अधिक महत्त्वाचा आहे. एखाद्या बातमीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असेल, प्रशासनाचे लक्ष एखाद्या समस्येकडे वेधले जात असेल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीचा आवाज संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचत असेल, तर तीच पत्रकारितेची खरी ताकद आहे. जनतेचा आवाज, जनहिताचा विचार ‘लोकसम्राट’ची वाटचाल ही जनतेशी जोडलेली आहे. लोकांच्या समस्या मांडणे, प्रशासनाला प्रश्न विचारणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे, हा या माध्यमाचा मूलभूत उद्देश आहे. सत्य, विश्वास आणि जनहित या मूल्यांच्या आधारावर पत्रकारितेची नवी ओळख निर्माण करण्याचा ‘लोकसम्राट’चा प्रयत्न आहे. पुढील वाटचालीचे ध्येय भविष्यात डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत पोहोचणे, स्थानिक प्रश्नांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देणे आणि तरुण पिढीला जबाबदार पत्रकारितेशी जोडणे, हे ‘लोकसम्राट’चे ध्येय आहे. लोकसम्राटची खरी ताकद त्याच्या नावात नाही, तर लोकांच्या विश्वासात आहे. आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या लोकचळवळीचे रूप घेऊ शकते. सत्यासाठी उभे राहणारी लेखणी, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे माध्यम आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता—हीच ‘लोकसम्राट न्यूज पोर्टल’ची खरी ओळख आणि चरित्रात्मक वाटचाल आहे. लोकसम्राट “लोकांचा आवाज… लोकांच्या प्रश्नांसाठी… लोकहिताच्या वाटेवर!”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

गणेश विसर्जन घाटांच्या दुरवस्थेवर नाराजी; मिरवणूक मार्गांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य वंतिने पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश दादा चिवटे यांना उमेदवारीला पाठिंबा…

मिरवणुकांच्या आवाजावरून पुन्हा प्रश्नचिन्ह; ‘तुमची घरे अडचणीत, आवाजाचा त्रास आधी मान्यतेय?’

मुख्य हेडलाईन “हातात पदवी, पण नोकरीचा पत्ता नाही! शिक्षण आणि रोजगारातील वाढती दरी तरुणांसाठी धोक्याची घंटा” उपशीर्षक “उद्योगांना हवीत कौशल्ये, विद्यार्थ्यांकडे आहेत पदव्या; रोजगारक्षम शिक्षणाची आता नितांत गरज”….

शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिल्यास नोकरी गमावण्याचा इशारा; ३४९ उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जाणार…

सोलापूर सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांच्या बेडवर ढेकूणांचा उपद्रव; रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…

Leave a Comment